संपादक-२०१० - लेख सूची

पत्रसंवाद/प्रतिक्रिया

अनंत बेडेकर, ४७, शांतिसागर सोसा., भारतनगर, मिरज ४१६४१०, मो.९४२१२२१७८२ ‘गुंडोपंत’ या नावाने सायबरावकाशात काही अन्य संदर्भात आलेल्या प्रतिक्रियेत ‘आसु हिंदुत्वविरोधी व परधर्मधार्जिणा असण्याबाबत’ आक्षेप घेण्यात आला आहे. (जून २०१०, अंक २१.३) असे नमूद करून नंदा खरे यांनी आसुचे संस्थापक दि.य.देशपांडे यांनी मागे या आक्षेपाला जे उत्तर दिले होते त्याचा त्यांना समजलेला गाभा म्हणून जी भूमिका …

तुमच्याशिवाय नाही

तत्त्वचर्चांची दृश्य रूपे कशी दिसतील? ती प्रतीकात्मकच असतील, की वास्तविक (realistic) असतील? बरे, तत्त्वचर्चा स्वभावानेच कोरड्या, नीरस. कला मात्र व्याख्येनेच रसाळ. मग तत्त्वचर्चांची दृश्य रूपे कधी कलात्मक होतील का? चर्चा मुळात शब्द हे माध्यम ओलांडून बाहेर, दृश्य रूपांत जाऊ शकतील का? साधारणपणे आपल्याला हे प्रश्न पडतही नाहीत, मग अस्वस्थपणे त्यांची उत्तरे शोधणे तर दूरचेच. पण …

पत्रसंवाद/प्रतिक्रिया

पत्रसंवाद/प्रतिक्रिया नंदा खरे गेल्या विशेषांकाचे अतिथि-संपादक प्रमोद सहस्रबुद्धे यांनी त्यांचे अंधश्रद्धांबाबतचे सर्वेक्षण सायबरावकाशात टाकले (mr.upakrama.org — नवे लेखन). त्यावरील चर्चा बहुतांशी सर्वेक्षण, ते सुधारण्याबाबत व व्यापक करण्याबाबत सूचना, अशी होती. एक प्रतिक्रिया मात्र जरा वेगळी होती, ती अशी — प्रेषकः गुंडोपंत लेखन मुळाबरहुकूम.] काही वेळा काही लोक स्वतःला पुरोगामी म्हणण्याच्या नादात देशी ते सर्व गौण …

संपादकीय मिलिंद मुरुगकर, अश्विनी कुलकर्णी

जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने स्वतंत्र भारताच्या इतिहासातील उच्चांक गाठला आहे. या महागाईला देशातील कोट्यवधी गरीब लोक कसे तोंड देत असतील. याचा विचारही हृदयद्रावक आहे. १९९० नंतरच्या अर्थव्यवस्थेने घेतलेल्या नवीन वळणानंतर देशाचा अर्थिक विकासाचा दर झपाट्याने वाढता राहिला. या विकासाचा फायदा अतिशय विषम पद्धतीने जनतेपर्यंत पोहचला. त्यामुळे समृद्धीची काही बेटे तयार झाली. पण फार मोठ्या जनसंख्येला विकासाचा …

भुकेचा जागतिक व राष्ट्रीय संदर्भ

भुकेचा जागतिक व राष्ट्रीय संदर्भ ९६३ दशलक्ष लोक सध्या जगात तीव्र उपासमारीने ग्रस्त आहेत. २००९ अखेर ही संख्या १०० कोटींवर जाऊ शकते. जगात तीव्र उपासमारीने ज्यांना आवश्यक पोषक आहार मिळत नाही, अशांपैकी दोन तृतीयांश लोक भारत, चीन, काँगो, बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान आणि इथिओपिया या देशांत आहेत. जागतिक भूक निर्देशांकानुसार पुरेसा पोषक आहार न मिळणाऱ्या, जगातील …

पत्रसंवाद

यमन गोखले, नागपूर. आज आपण सर्व एकविसाव्या शतकात जगत आहोत. आजच्या विकसित तंत्रज्ञानामुळे आपले जगणे अधिकाधिक सुकर होत चालले आहे. ह्या तंत्रज्ञानाची आणि देववादाची सांगड भावनिक पातळीवर घालण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. जसे एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला लागलेल्या विमानाचा शोध म्हटले तर आपला भारतीय म्हणतो, “ते काय सांगता ? त्या अमक्या तमक्या पुराणात देवाने विमानाचा वापर …